Bigg Boss Marathi 5 : ‘तुम्ही स्वत:ला काय समजता?’; आर्याने नियम तोडल्याने रितेश भाऊंचा पारा चढला, काय असेल ‘बीबी’चा निर्णय?

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा लयभारी खेळ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. बिग बॉसच्या घरातला प्रवास असो किंवा आयुष्यातला संयम हा खूप महत्त्वाचा असतो. एकदा संयम सूटला की खेळ संपला.
या आठवड्यात आर्याचा संयम सूटलेला पाहायला मिळाला. तिच्याकडून एक खूप मोठा नियम ब्रेक झाला. त्यामुळे बिग बॉसने त्यांना जेलमध्ये जाण्याची शिक्षा सुनावली आहे. परंतु त्या घटनेचा निर्णय आज होणार आहे.
आर्याला रितेश भाऊ आज जाब विचारताना दिसून येईल. प्रोमोमध्ये रितेश भाऊने आर्याला जेलमधून बाहेर काढत विचारतोय,”तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हाला राग आला की कोणावरही हात उचलणार?
View this post on Instagram
आर्या तुम्ही जे केलं ते 100% इंटेशन्ल होतं. मी बिग बॉसला रिक्वेस्ट करतो त्यांनी आपला निर्णय सांगावा”. आता बिग बॉस काय निर्णय घेणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात अग्रेशनच्या सगळ्या सीमा पार करण्यात आल्या. धक्काबुक्कीत आर्याला निक्कीची हात लागला. त्यानंतर आर्याचा संयम सुटला आणि आता मारेल असं म्हणत तिने निक्कीच्या कानशिलात लगावली. आर्याने बिग बॉसच्या मुलभूत नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आता तिला काय शिक्षा मिळणार हे पाहावे लागेल.





