Bigg Boss Marathi 5 : ‘त्यांनी प्रत्येक गोष्टीत आपला स्वार्थ बघितला…’; भाऊच्या चक्रव्यूह मध्ये उघडणार पॅडी दादांचे डोळे?

Bigg Boss Marathi 5 । Pandharinath Kamble : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज भाऊच्या धक्क्यावर चक्रव्यूह रूम उघडली जाणार आहे. या रूममध्ये गेल्यावर सदस्यांची चक्र बदलत असतात. सदस्य चक्रावून जात असतात. कोण आपला कोण परका या गोष्टी सदस्यांना कळतात. आज पॅडी दादांना कोण आपलं आणि कोण परकं हे कळणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ पॅडी दादांना चक्रव्यूह रूममध्ये बोलवताना दिसत आहे. पॅडी भाऊ म्हणतोय,”यांनी कदाचित प्रत्येक गोष्टीत आपला स्वार्थ बघितला असेल, घराबाहेर गेल्यानंतर त्यांना कळेल आपली तेव्हाची स्टेटमेंट खूप चुकीची होती.
कारण मी कधीच स्वार्थीपणे कोणती गोष्ट केली नाही. प्रत्येक गोष्टीत नि:स्वार्थ भावना होती”. त्यानंतर बाहेर येत पॅडी दादा अंकिता आणि डीपी दादाचे आभार मानताना दिसत आहे”.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आज कोणाचा प्रवास संपणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तसेच आजच्या भागात महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ सदस्यांना मोठा धक्कादेखील देणार आहे.
‘वाइल्ड कार्ड नाहीत तर माईल्ड कार्ड म्हणून आलात”; रितेशने घेतला संग्रामचा क्लास
प्रोमोमध्ये संग्राम चौगुलेच्या न दिसण्याबद्दल रितेश भाऊ त्याचा क्लास घेताना दिसून येत आहे. रितेश भाऊ म्हणतोय,”संग्राम तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात. पण ‘बिग बॉस’च्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया आहात.
दिसतच नाही आहात तुम्ही. महाराष्ट्राची अपेक्षा होती की या घरात एक वाइल्ड कार्ड यावा, त्याने एक अख्खा गेम पलटवून टाकावा. ‘बिग बॉस मराठी’च्या या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर माइल्ड कार्ड म्हणून आलेले आहात”.





