Bigg Boss Marathi 5: निक्कीमुळे अरबाजच्या फीलिंग्ज झाल्या हर्ट; घरातील भांडी फोडून करतोय कल्ला

अरबाजला होतोय निक्कीच्या वागण्याचा त्रास
Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी वरून एक वेगळाच वाद होत असल्याचा पाहायला मिळत आहे. अरबाजने त्याची कॅप्टनसी निक्कीला दिल्यापासून निक्की खूप बदलली आहे असे, अरबाज आणि टीम ‘A ‘मधल्या बाकी सदस्याचे देखील मत आहे.
या विषयावरूनच अरबाज, वैभव DP दादांशी बोलताना दिसत आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोत तूम्ही पाहू शकता की, अरबाज DP दादांना म्हणत आहे की,” मला कंट्रोल नाही होत आता. मी कॅप्टनसी रूम सोडून बाहेर जात होतो झोपायला.
View this post on Instagram
बाथरूम साफ करत होतो, झाडू मारत होतो. ती मला म्हणते की, माझ्या कॅप्टनसीच्या रूममध्ये येऊ नकोस. माझ्या कॅप्टनसीवर अडथळा निर्माण होऊ शकतो.
मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होत पण, जे माझ्या समोर घडत आहे ना त्याचा होत आहे आणि ती ते मुद्दमुन करत आहे.” यावर DP दादा म्हणतात की,” तू सोड यावर लक्ष देऊ नको.”
‘मी घराची महाराणी”; निक्कीच्या वक्तव्यावर जान्हवी अन् अरबाज भडकले
बिग बॉस मराठीच्या घरात चक्रव्युहात अडकल्यानंतर निक्कीची खेळ खेळण्याची चक्र बदलली आहेत. टीम A मधल्या सदस्यांसोबत निक्की आज वाद घालताना दिसून येणार आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की, वैभव आणि जान्हवीमध्ये झालेला राडा पाहायला मिळतोय. निक्की म्हणतेय,”बिग बॉस मराठीच्या घराची मी महाराणी आहे”.
त्यावर जान्हवी म्हणते,”तू नोकराणी पण होऊ शकत नाहीस”. त्यावर निक्की वैभवला म्हणते,”कॅप्टन तरी तुम्ही होऊ शकता का?”. निक्कीला उत्तर देत वैभव म्हणतो,”न्हासके… बास कर”.
त्यावर निक्की त्याला बच्चू म्हणते. पुढे वैभव निक्कीला म्हणतो,”तोंड दिलंय म्हणून काहीही बोलू नको. तुझी मस्ती जिरवली नाही ना तर बघ”. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची बदललेली रूप पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे.





