Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात होणार मिड वीक एव्हिक्शन; ग्रँड फिनालेपूर्वीच ‘हे’ सदस्य होणार घराच्या बाहेर !

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता अंतिम टप्प्यावर आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात वेगवेगळे धमाके घडत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच अनेक गोष्टी या पर्वात घडत आहेत. अशातच आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात मिड वीक एव्हिक्शन होणार आहे.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”संपूर्ण सीझनमध्ये, सगळ्यात कठीण आणि त्रासदायक असतं हे मिड वीक एव्हिक्शन…आणि आज या मिड वीक एव्हिक्शनमध्ये घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव आहे….”.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आज कोणाचा प्रवास संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू – वालावलकर , धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी एकाचा प्रवास आज संपलेला पाहायला मिळेल.
“मी जिंकली तर ट्रॉफी तूझ्या हातात देईन..” निक्की स्पष्टच म्हणाली । Bigg Boss Marathi 5
View this post on Instagram
सुरज निक्कीला म्हणाला, “तुझा घरामध्ये मूड नसतो कारण तुझा मुड घराच्या बाहेर गेला आहे. जर तुझा मूड समोर आला तर लगेच त्याला मिठी मारशील. त्याला बोलशील, माझे पिल्लू किती दिवसांतून आले मला भेटायला. तुला सारखी त्यांची आठवन येत असते.
तो अजून तूझ्या डोक्यातून नाही गेला. त्यावर निक्की म्हणाली,” असे काही नाही. मी अजिबात त्याच्या कडे जाणार नाही. मी उलट तूझ्याकडे येईन तू मला सांभाळ आणि त्याला बोल लांब राहा. मी त्याला माझ्या डोक्यातून कधीच काडून टाकले आहे.
सूरज यावर म्हणाला, “त्याला तू डोक्यातून काडून टाकशील पण तो हृदयातून नाही जाणार. तू आता बोलतेस की, मी नाही जाणार पण जर तू तुला म्हणाला, निक्की सॉरी. लगेच तू त्याला माफ करून गळ्यात पडशील.
यावर निक्की म्हणाली,” हा तुझा गैरसमज आहे. चल आपण पैज लावू. पैशाची नाही तुला जे हवे ते मी देईन. त्यावर सूरज म्हणाला,” मला ट्रॉफी देणार का? त्यावर निक्की म्हणाली,” हो, मी तुला आधीच म्हणाली की, मी जर जिंकली तर ट्रॉफी तूझ्या हातात देईन.” असं ती यावेळी म्हणते.





