\n

अमेय खोपकर म्हणाले की, “पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संधर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलाय. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना.. आताही बिग बॉस मध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ती आम्ही मस्त एंजॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरजच नाही. तू बिनधास्त लढ, आम्ही आहोत तुला फायनलपर्यंत घेऊन जायला’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

\n

जान्हवी नेमकं काय म्हणाली?
\n
बिग बॉसच्या टास्कनंतर जान्हवी म्हणाली, “पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअ‍ॅक्टिंग घरात दाखवत आहेत.” जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा केलेला अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हा जान्हवी “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही,” असे म्हणाली. जान्हवीचे वागणे पाहून प्रेक्षकांनी देखील संताप व्यक्त केला असून तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

\n

अभिजीत केळकरची पोस्ट
\n
‘होय, आमचा पॅडी ‘जोकर’च आहे… कुठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा…slapstick चा हुकमी एक्का…गायन आणि नृत्याच्याही राज्यात सहज मुशाफिरी करणारा हरहुन्नरी, चतुरस्त्र अभिनेता.

\n

बऱ्या वाईट परिस्थितीतून, आयुष्यातल्या ups n downs मधून ताऊन सुलाखून निघालेला…पाय घट्ट रोवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि ह्या सगळया सगळ्याचा वागण्या बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस…

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

\n
\n
\n

\n

मित्रा, तुझ्या संयमाला साष्टांग नमस्कार आणि तुला एक जोरदार जादू की झप्पी…मी आत्ताच तुझी finaleची AV बघतोय…ह्या पालापाचोळ्याला तू तुझ्या हुशारीने कसं “छू” केलंयस. त्यांचं त्यांनाही कळलं नाहीये. हा संयम ढळू देऊ नकोस आणि काहीही झालं तरी nervous होऊ नकोस.

\n

तू आत भीड, आम्ही तुझ्यासाठी बाहेर आहोतच… रितेशभाऊ, कलर्स मराठी…पॅडीबद्दल जे बोललं गेलंय ते ही अक्षम्यच आहे. पॅडी कांबळे आणि वर्षा उसगावकर ताईंनी माफ केलं असेल कदाचित, पण आम्ही कधीच करणार नाही,’ असे अभिजीत केळकर त्याच्या पोस्टमध्ये बोल ताना दिसत आहे.

\n

विशाखा सुभेदार यांची पोस्ट
\n
“केहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना.. पॅडी more power to u. विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक. निकी बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना “जोकर “म्हणालात.. ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते, ती तुमच्याकडे नाही.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

\n
\n
\n

\n

गेली अनेकं वर्ष हे कामं तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे आणि अगं ए मुली, तुझा जन्म कदाचित 2000 तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली 1998 मध्ये.

\n

त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला..येड्यांची जत्रा मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. जान्हवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाही ते..

\n

गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते..! आणि त्यांच्या विनोदाचा टाइमिंग याबद्दल तर तू बोलायचंस नाही. नखाची किंमत नाहीये तुला आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केलाय आतापर्यंत.. Game आहे game आहे असं म्हणतं मी दोन तीन एपिसोड पहिले, पण तुम्ही तर थांबतच नाही आहात.

\n

ताईंनी glamour मिळवून दिलं मराठी सिनेमाला… त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई… त्यांच्या दमावर त्याकाळातल्या कलाकारां वरच्या प्रेक्षक प्रेमामुळे, नाटक सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखण बंद करा, जरा बोलताना भान ठेवा. विनोदा मुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, 50 शी पूर्ण झालीय त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो, शांत आहे ह्याचा अर्थ अस नाहीये कीं त्याल सेल्फ respect नाहीये..!

\n

आता थोडं पॅडी बद्दल.. पॅडी माऊली, तूझा खेळ तू खुप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा…! आता तर तू जोरात आलायस..! इतका हिडीस बोलल्यानंतर ही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयत त्याबद्दल तुला सलाम… खचून जाऊ नकोस…! टास्क मध्ये जोर लावून खेळ मित्रा..! तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलस आज.

\n

एक उत्तम reactor असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खुप खुप कौतुक…! बाकी तुझ्या फळांनी मज्जा आणली. काय timing भन्नाट. निकीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत.. खरंतर जां रोज जां.. आणि तीचे वाळत घातले पापड असतील नां त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडा चा…! करियर वर बोलायच नाही….”, अशी लांबलचक पोस्ट विशाखा सुभेदार यांनी केली आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Bigg Boss Marathi 5: जान्हवीने पॅडीचा अभिनयावरून केला अपमान; थेट मनसे नेत्याचा पॅडी कांबळेंना पाठिंबा, पोस्ट चर्चेत….","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/08/mediaonesaurabhmore-2024-08-21T102420.756.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-marathi-5-janhvi-insults-paddy-for-acting-direct-mns-leaders-support-to-paddy-kamble-post-in-discussion#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/08/mediaonesaurabhmore-2024-08-21T102420.756.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-marathi-5-janhvi-insults-paddy-for-acting-direct-mns-leaders-support-to-paddy-kamble-post-in-discussion#webpage","name":"Bigg Boss Marathi 5: जान्हवीने पॅडीचा अभिनयावरून केला अपमान; थेट मनसे नेत्याचा पॅडी कांबळेंना पाठिंबा, पोस्ट चर्चेत….","url":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-marathi-5-janhvi-insults-paddy-for-acting-direct-mns-leaders-support-to-paddy-kamble-post-in-discussion","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-marathi-5-janhvi-insults-paddy-for-acting-direct-mns-leaders-support-to-paddy-kamble-post-in-discussion#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/08/mediaonesaurabhmore-2024-08-21T102420.756.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-marathi-5-janhvi-insults-paddy-for-acting-direct-mns-leaders-support-to-paddy-kamble-post-in-discussion#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/bigg-boss-marathi-5-janhvi-insults-paddy-for-acting-direct-mns-leaders-support-to-paddy-kamble-post-in-discussion","name":"Bigg Boss Marathi 5: जान्हवीने पॅडीचा अभिनयावरून केला अपमान; थेट मनसे नेत्याचा पॅडी कांबळेंना पाठिंबा, पोस्ट चर्चेत…."}}]}}}

Bigg Boss Marathi 5: जान्हवीने पॅडीचा अभिनयावरून केला अपमान; थेट मनसे नेत्याचा पॅडी कांबळेंना पाठिंबा, पोस्ट चर्चेत….