Bigg Boss Marathi 5 : धमाकेदार डान्सचा जलवा ! स्पर्धकांच्या जबरदस्त परफॉर्मन्सने वाढणार ग्रँड फिनालेची रंगत

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या ग्रँड फिनालेकडे सर्वांच्या नजरा आहेत. कोण होणार या पर्वाचा विजेता हे जाणून घेण्यासह आज कोण काय परफॉर्म करणार हे जाणून घेण्याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आपल्या दिलखेचक अदांनी निक्की आणि जान्हवी ग्रँड फिनालेच्या मंचावर चांगलीच रंगत आणणार आहेत.
जान्हवी आणि निक्कीच्या सेन्सेशनल परफॉर्मन्सने ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर चांगलीच रंगत येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील धाकड गर्ल म्हणून जान्हवी आणि निक्कीकडे पाहिले जाते. त्यामुळे आज ग्रँड फिनालेलाही त्या धाकड जलवा दाखवताना दिसून येतील.
‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात ब्लॉकबस्टर ठरलेल्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. या भव्यदिव्य ग्रँड सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेला आज (6 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.
‘इरिना-वैभव’च्या धमाकेदार डान्सचा जलवा :
ग्रँड फिनालेमध्ये परदेसी गर्ल इरिना रुडाकोवा आणि बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाणचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे. अत्यंत सुंदर आणि रोमँटिक स्टेप्सने हा परफॉर्मन्स खुलून आला आहे. घरातील दोघांची मैत्री, केमेस्ट्री डान्समध्ये देखील दिसून येत आहे.
डान्सची झलक इतकी सुंदर तर पूर्ण परफॉर्मन्स किती छान असेल अशी उत्सुकता आता चाहत्यांमध्ये आहे. तसेच, ‘झापुक झुपूक’ हुकस्टेप करत हे दोघंही सर्वांचं मन जिंकून घेणार आहेत. डान्स करताना दोघांचाही डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर अवतरणार ‘आई तुळजाभवानी :
‘आई तुळजाभवानी’ ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. ‘आई तुळजाभवानी’ ही पौराणिक मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावरदेखील ‘आई तुळजाभवानी’ अवतरणार आहे. अभिनेत्री पूजा काळे या मालिकेत ‘आई तुळजाभवानी’चे पात्र साकारत आहे.





