Bigg Boss Marathi 5 : डोळे दिपवणाऱ्या ट्रॉफीने वेधलं स्पर्धकांचं लक्ष; अखेर ‘बिग बॉस’ची ट्रॉफी झाली रिव्हील !

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता खऱ्या अर्थाने खेळात रंगत आली आहे. सदस्यांमध्ये आता अटीतटीची लढाई सुरू आहे. नेहमीप्रमाणे या पर्वाच्या ट्रॉफीनेदेखील ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’ म्हणत आहेत, “स्वागत करुया अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांचं”. पुढे अमेय आणि अमृता ‘बिग बॉस मराठी’ची या पर्वातील ट्रॉफी रिव्हील करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील ट्रॉफीने सर्वांचंचं लक्ष वेधून घेतलं आहे. डोळे दिपवणारी अशी ही ट्रॉफी आहे. ‘बिग बॉस’च्या या मानाच्या ट्रॉफीवर सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता प्रभू-वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर, यांच्यापैकी एकजण मानाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणतो…
“बिग बॉस मराठी’चा हा सीझन अनेक सरप्राईजेस आणि ट्विस्टने भरलेला होता. प्रत्येक आठवड्यातील भाऊच्या धक्क्याने टीआरपीचे उच्चांक गाठले. छोट्या पडद्यावरचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गाजला. गेले दोन आठवडे व्यस्त चित्रिकरणामुळे मला भाऊच्या धक्क्यावर येता आलं नाही.
तुम्ही सर्वांनी माझी आठवण काढलीत, याचा मला अंदाज आहे. पण आता ग्रँड फिनालेला मी या दोन आठवड्याची कसर भरून प्रेक्षकांना मनोरंजनाची तुफान मेजवानी देणार आहे. खूप सरप्रायजेसनी , उत्सुकतेने भरलेला हा ग्रँड फिनाले असेल”. असं तो म्हणाला.





