Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे चक्र फिरणार; आज उघडणार भाऊची ‘चक्रव्यूह’ रूम, Video व्हायरल !

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आज अशी रूम उघडणार आहे या रूममधून घरातली सगळी चक्र बदलणार आहेत. या रूममध्ये गेल्यानंतर सदस्य चक्रावून जाणार आहेत.
कारण कोण आपला आहे आणि कोण परका हे सदस्यांना कळणार आहे. ‘भाऊची चक्रव्यूह रूम’ असं या रूमचं नाव आहे. उद्धाटन म्हटलं की पुढारी हवेच..
View this post on Instagram
त्यामुळे छोटा पुढारी अर्थात घन:श्याम या रूमचं उद्धाटन करताना दिसेल. एकंदरीतच ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच मजेदार असणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील खाष्ट सासू कोण?
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज अक्षय केळकर, गायत्री दातार आणि पायल जाधव हे ‘अबीर गुलाल’ मालिकेतील कलाकार जाणार आहेत. त्यावेळी ते सदस्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीतील ट्रॉफी द्यायला लावतील. दरम्यान ‘खाष्ट सासू’ची ट्रॉफी निक्की वर्षा उसगांवकरांना देताना दिसून येईल.
‘या’ आठवड्यात ‘हे’ सदस्य डेंजर झोनमध्ये
‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे चार सदस्य डेंजर झोनमध्ये आहेत.
या चार सदस्यांपैकी कोणाचा प्रवास आज संपणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तसेच आजच्या भागात महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ सदस्यांना मोठा धक्कादेखील देणार आहे.





