Bigg Boss Marathi 5: “मी जिवंत असेपर्यंत तुला…’; रक्षाबंधनच्या निमित्ताने निक्कीने सूरजला दिलं खास वचन

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जोरदार रक्षाबंधन सेलिब्रशन होत आहे. घरातील सदस्य एकमेकांना राखी बांधताना दिसत आहेत. छोटा पुढारीने निक्कीला आपल्या बहिणीचा दर्जा दिला होता.
आता आजच्या भागात निक्की सूरजला राखी बांधताना दिसणार आहे. निक्कीआधी सूरजला जान्हवी आणि ‘अबीर गुलाल’ मालिकेतील श्रीने राखी बांधली होती.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की सूरजला राखी बांधताना दिसणार आहे. सूरजला राखी बांधत निक्की म्हणते,”बिग बॉस मराठी’च्या घरात जेवढे दिवस आपण एकत्र आहोत त्याच्यासह बाहेरच्या जगातदेखील मी तुझं रक्षण करेल”.
View this post on Instagram
त्यावर सूरज म्हणतो,”मी तुझी बाहेरच्या जगात रक्षा करेल”. निक्की पुढे म्हणते,”मी जिवंत असेपर्यंत तुला काही कमी जाणवणार नाही. तुला कधीही माझी आठवण आली तर फक्त एक कॉल कर.
तुझ्यासाठी मी कायम हजर असेल..नेहमी आनंदी राहा”. त्यानंतर अंकिता डीपी दादाला राखी बांधते. तर दुसरीकडे इरिनाला आपल्या भावाची आठवण येते आणि तिचे डोळे पाणावतात. अरबाजकडे इरिना आपल्या मनातील भावना व्यक्त करते.
अंकितावर जळतोय डीपी दादा
अंकिताने ‘जळतात मेले’ लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं आहे. त्यामुळे कॅमेऱ्याकडे पाहून डीपी दादा म्हणतो,”मी कोल्हापूरातून आलोय. लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करायला मी इथे आलोय. पण माझ्याकडे काम काय कोण रडलं तर त्यांना हसवा.
त्यानंतर ‘बिग बॉस’ अंकिताला विचारतात,”अंकिता तुमच्या टी-शर्टवर काय लिहिलंय?”. त्यावर अंकिता म्हणते,”जळतात मेले”. बिग बॉस म्हणतात,”धनंजय यांचं तेच होतंय”.





