Bigg Boss Marathi 5: अंकिता प्रभू-वालावलकर ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर; थक्क करणारा Video आला समोर !

Bigg Boss Marathi 5 । Ankita PrabhuWalawalkar: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात ‘कोकण हार्टेड गर्ल’ सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आहे. पण अंकिता प्रभू-वालावलकरचा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास आता संपला आहे.
बिग बॉस मराठीच्या घरावर कोकणाच्या चेडवाचा राज पाहायला मिळाला. पण अंकिता आता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे.
View this post on Instagram
प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणत आहे, “या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता”. त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत.
‘बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर घराबाहेर पडली आहे. अंकिताने बिग बॉस मराठीचा खेळ चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी ती कमी पडल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.
‘अंकिता प्रभू वालावलकर’ नेमकी कोण आहे?
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर अनेकजण विविध पोस्ट शेअर करत असतात. यात इन्फ्लुएंसरची संख्या जास्त आहे. मराठी इन्फ्लुएंसर्स यात उठून दिसतात. अशीच एक मराठी इन्फ्लुएंसर म्हणजे ‘अंकिता प्रभू वालावलकर…’ अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियावर अंकिता वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिचे व्हीडिओ इन्स्टाग्रामवर ट्रेंड होतात. तर तिचे फोटोही चाहत्यांना भावतात. अंकिताचं यूट्यूब चॅनेलही आहे. अंकिता अस्सल मालवणी भाषेत व्हीडिओ करते.
तिच्या कोकणी बोलीतील व्हीडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने अंकिताला ओळखलं जातं. इन्स्टाग्रामवर तिचं याच नावाने अकाऊंट आहे. लाखांहून अधिक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.





