Bigg Boss Marathi 5 : ….अन् आर्याने मारली निक्कीच्या थोबाडीत; ढसाढसा रडू लागली, Video व्हायरल !

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की टास्क, मजा-मस्तीसह वाद, आरडाओरडा, भांडण, तंटा हे सगळं काही आलंच. या नव्या पर्वानेही अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नव्या पर्वात आर्या आणि निक्की अनेकदा एकमेकांसोबत वाद घालताना दिसून आल्या आहेत. पण आज त्यांच्या वादाने उच्चांक गाठला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज कॅप्टन्सीचा टास्क पार पडणार आहे. या टास्कदरम्यान आर्या व निक्कीमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि नंतर आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अशा प्रकारचं कृत्य अमान्य आहे. बिग बॉसदेखील याचा निषेध करतात.
कॅप्टन्सीवरुन आर्या आणि निक्कीची जोरदार जुंपली आहे. निक्कीच्या कानशिलात लगावत आर्याने ‘बिग बॉस’च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे बिग बॉस आर्याला काय शिक्षा ठोठावणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या कॅप्टन्सी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा ताई, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्याच्या झटापटीत आर्या व निक्की यांच्यात जोरात जुंपली.
निक्की आणि आर्याच्या या भांडणाचे रूपांतर नंतर झटापटीत आणि त्यानंतर कानफटीत खेचण्यापर्यंत झाले. बिग बॅास यांनी आर्याच्या या कृत्याचा निषेध केला असून यात तिला काय शिक्षा होईल , हे उद्याच्या भागात कळेलच.
आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्यानंतर निक्की ‘बिग बॉस’ला सांगत आहे की,”आर्याने मला मारलंय.. मी हे सहन करू शकत नाही”. त्यावर आर्या म्हणतेय,”मला काही घेणं देणं नाही. मला जेल मध्ये पाठवा नाहीतर घरी पाठवलं तरी चालेल”.
पॅडी दादांचा अनोखा फंडा !
पॅडी दादा म्हणत आहेत,”लहानपणापासून पकडापकडी खेळताना कोणाच्या हाताला लागायचं नाही हा आपला फंडा आहे”. त्यावर घरातील मंडळी पॅडी दादांचं त्यांच्या खेळाबद्दल कौतुक करताना दिसतात. अरबाज पॅडी दादांना म्हणतोय,”सोडायचं नाही हेच फक्त माझ्या डोक्यात होतं”.





