Bigg Boss Marathi 5: नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी भिडले; कोण होणार नॉमिनेट? पाहा Video

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज दुसरं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या नॉमिनेशन कार्यात कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
या नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत आणि छोटा पुढारी एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. तसेच नॉमिनेट झालेल्या कोणत्या सदस्याला बिग बॉस सेफ करणार हे पाहावे लागेल.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये पॅडी-योगिता, निखिल-सूरज, वर्षा-जान्हवी, अरबाज-धनंजय, वैभव-इरिना, आर्या-अभिषेक, वर्षा-घन:श्याम अशा जोड्या बनलेल्या दिसत आहेत.
घरातील सदस्यांनी अंडी, कांदा-बटाटा अशा अनेक गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. दरम्यान अभिजीत सावंत आणि छोटा पुढारी एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत.
अंडी, बटाटा आणि कांदे अशा अनेक गोष्टी ‘बिग बॉस मराठी’च्या सदस्यांनी नॉमिनेट केल्याने घरात जेवण बनवायचे वांदे होणार आहेत. सदस्यांचे झालेले वांदे पाहायला प्रेक्षकांना मात्र मजा येणार आहे.





