Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; ‘या’ खास ठिकाणी पार पडला सोहळा
Palak Puraswani : लग्न सोहळ्यासाठी पलकने लाल रंगाचा लेहंगा, तर रोहनने शाही पारंपरिक शेरवानीचा पेहराव केला होता.

Bigg Boss OTT 2: ‘बिग बॉस ओटीटी २’ ( Bigg Boss OTT 2) फेम अभिनेत्री पलक पुरसवानीने बॉयफ्रेंड रोहन खन्नासोबत लग्नगाठ बांधली. लग्न सोहळ्याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील ११२ फूट उंचीच्या आदियोगी पुतळ्यासमोर या जोडप्याने सात फेरे घेऊन आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. हा शाही लग्न सोहळा २६ जून २०२६ रोजी पार पडला. ( Bigg Boss OTT 2)
पलक पुरसवानी आणि रोहन खन्ना यांच्या लग्नाला जवळचे कुटुंबिय, मित्रपरिवार उपस्थित होते. आपल्या खास लग्न सोहळ्यासाठी पलकने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता, तर रोहनने तिला साजेसा असा शाही पारंपरिक शेरवानीचा पेहराव केला होता.पारंपरिक लेहंग्यासोबत हिरव्या रंगाचे शाही दागिने परिधान केल्यामुळे पलक अतिशय सुंदर दिसत होती. (Bigg Boss OTT 2)
पलकने या पोस्टला कॅप्शन दिले की, “काही प्रेमकथा नियतीने लिहिलेल्या असतात, आमची निवड महादेवाने केली, From two souls, to one forever…२६.०६.२६” कपलने फोटो शेअर करताच टीव्ही आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी त्यांचे अभिनंदन केले. (Bigg Boss OTT 2)
पलक पुरसवानीने ‘बडी देवरानी’ आणि ‘ये रिश्ते हैं प्यार के’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती ‘बिग बॉस ओटीटी २’ आणि ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला सीझन ७’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे. (Bigg Boss OTT 2)
हेही वाचा:






