Bigg Boss 15 : तेजस्वी प्रकाश ठरली ‘बिग बॉस 15’ ची विजेती

मुंबई – भांडण, प्रेम, द्वेष आणि स्पर्धा या सगळ्यांचं मिश्रण असलेला सर्वांचा लाडका रिएलिटी शो ‘बिग बॉस 15’ला आपला विजेता मिळाला आहे. यंदाच्या 15 व्या पर्वातील बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर काल बिग बॉस हिंदीच्या 15 व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली.
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या ‘बिग बॉस 15’ची विजेती ठरली आहे. सध्या तेजस्वी प्रकाशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी तेजस्वीला बिग बॉसची ट्रॉफी आणि 40 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. तसेच, प्रतिक सेहजपाल हा उपविजेता ठरला आहे. काल हा महाअंतिम सोहळा रंगला होता.
View this post on Instagram
या दिमाखदार सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी बिग बॉसच्या या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. बिग बॉसच्या टॉप 6 मध्ये तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळाले.





