‘तर संजय राऊतांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी’काँग्रेस नेत्याची मागणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद देण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस चांगलीच नाराजी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासहित इतर नेत्यांनीही ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
संजय राऊत ने कहा है कि वे #सचिन_वज़े की पुलिस में दुबारा बहाली के खिलाफ थे।हालाँकि वे कल तक वज़े को ईमानदार और सक्षम बता रहे हैं।
फिर भी वे कौन-से नेता थे जिनके कंधे पर चढ़कर वज़े आया,यह बताना पड़ेगा।#NIA को राऊत जैसे बकबक करनेवालों को उठाकर वज़े के आकाओं तक पहुँचना चाहिए।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 30, 2021
त्यांनी ट्विट केले आहे की,’संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं म्हणत होते, आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचं सांगतात. एनआयएनं आता संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी’ अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांचा या ट्विटमुळे राजकीय कलगीतुरा रंगला आहे.
तत्पूर्वी, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसनंतर आता एनआयएकडून मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला असताना संभाव्य अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या वाझे यांना दिलासा मिळू शकलेला नाही. या प्रकरणात वाझेंना अटक करण्यात आली असून कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. सचिन वाझेंवर एनआयएने गंभीर आरोप केले असून, अटकेनंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते की, कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असं संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.





