Baramati by-election : मोठी अपडेट! सहा जणांनी घेतली माघार; कोण आहेत ते उमेदवार? आजचा दिवस निर्णायक असणार
Baramati by-election : बारामती पोटनिवडणुकीसाठी सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. आज 9 एप्रिल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Baramati by-election : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक जाहीर झाली असून त्यांच्या पत्नी व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले असून निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. Baramati by-election
सुरुवातीला एकूण 53 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज सहा जणांनी माघार घेतली आहे. माघार घेणाऱ्यांमध्ये विलास होळकर, माऊली कांबळे, रझाक मुलाणी, राहुल थोरात, अमोल कोकरे आणि अशोक खामगळ यांचा समावेश आहे. त्यामुळे आता एकूण 47 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उरले आहेत. आज 9 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे.
दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. महायुतीकडून काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीकडूनही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला गेला आहे. मात्र काँग्रेसने अद्याप अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. काँग्रेसकडून आकाश मोरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
विशेष म्हणजे बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवू नये, अशी भूमिका पक्षातील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी देणे राजकीय संकेतांना धरून नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. काही नेत्यांनी तर उमेदवार कायम ठेवला तर प्रचारात सहभागी होणार नसल्याची भूमिकाही घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे. अंतिम मुदतीनंतर नेमके किती उमेदवार रिंगणात राहतात आणि खरी लढत कोणामध्ये होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाची वेट अन्ड वॅाचची भूमिका Baramati by-election
एकीकडे काँग्रेसने उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेने अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. यावरुन असे दिसते की ठाकरे गटाच्या शिवसेनेने सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. पक्ष लवकरच अंतिम निर्णय घेईल, असे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. Baramati by-election
हेही वाचा : Drugs Seized : शेंद्रे-सोनगाव रोडवर पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.८० लाखांच्या ड्रग्जसह दोघांना बेड्या






