सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; नवा सुगावा हाती लागणार? मुंबई पोलिसांनी….

Salman Khan’s house | Mumbai Crime Branch – अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानासमोर रविवारी (14 एप्रिल) दोन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणी नवी मुंबईच्या परिसरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयित ताब्यात देखील घेतले. या गोळीबाराची राज्य सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत आणि त्याच्या घराबाहेरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली आहे. दरम्यान, अश्यातच या प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबार प्रकरणी सलमान खान याचा जबाब नोंदवला आहे. 4 जूनला मुंबई पोलिसांनी हा जबाब नोंदवला, बिश्नोई गँगने सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता.
नेमकं प्रकरण काय? वाचा….
मुंबईतील वांद्रेमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर आरोपींनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला.
पोलिसांनी 72 तासांमध्ये आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.





