Rishab Shetty : कांतारा 3 विषयी मोठी अपडेट! या दोन मोठ्या प्रोजेक्टबद्दल काय म्हणाला ऋषभ शेट्टी?
Rishab Shetty : चाहत्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन संपूर्ण टीम चित्रपटावर बारकाईने काम करत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

Rishab Shetty : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शनाने वेगळी ओळख निर्माण करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) सध्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे चर्चेत आहे.
‘कांतारा’च्या अभूतपूर्व यशानंतर आता त्याने ‘कांतारा: चॅप्टर ३’सह आगामी चित्रपटांबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. ‘व्हेरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऋषभ शेट्टीने सांगितले की, ‘कांतारा: चॅप्टर ३ ‘च्या स्क्रिप्ट आणि प्री-प्रॉडक्शनचे काम सध्या वेगाने सुरू आहे. चाहत्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन संपूर्ण टीम चित्रपटावर बारकाईने काम करत असल्याचे त्याने स्पष्ट केले. (Rishab Shetty)
दिग्दर्शनाबद्दल बोलताना ऋषभ म्हणाला की, अभिनयाइतकाच दिग्दर्शनही त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. चित्रपट दिग्दर्शित करताना त्याला वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. अभिनेता आणि दिग्दर्शकासोबतच निर्माता म्हणूनही तो सक्रिय असून, त्याच्या ‘ऋषभ शेट्टी फिल्म्स’ या बॅनरअंतर्गत यावर्षीच्या अखेरीस दोन नव्या चित्रपटांची घोषणा करण्यात येणार आहे.
हेही वाचा : Gargi Phule : ‘रीलस्टार कलाकार नसतात’; गार्गी फुलेंनी सगळचं काढलं! महेश मोटेचं नाव न घेता लगावला सणसणीत टोला
दरम्यान, ऋषभ शेट्टी लवकरच दिग्दर्शक प्रशांत वर्माच्या सिनेमॅटिक युनिव्हर्समधील बहुप्रतिक्षित ‘जय हनुमान’ या चित्रपटात भगवान हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. (Rishab Shetty)

Rishab Shetty : कांतारा 3 विषयी मोठी अपडेट! या दोन मोठ्या प्रोजेक्टबद्दल काय म्हणाला ऋषभ शेट्टी?
याशिवाय ऋषभ शेट्टी ‘द प्राईड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका त्याच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि आव्हानात्मक भूमिकांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. (Rishab Shetty)
या दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणाबाबत ऋषभने स्पष्ट केले की, ‘जय हनुमान’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या दोन्ही भूमिकांसाठी वेगवेगळ्या शारीरिक तयारीची आणि लूकची गरज आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांचे शूटिंग एकाच वेळी शक्य नाही. तो आधी ‘जय हनुमान’चे चित्रीकरण पूर्ण करणार असून, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी आवश्यक तयारी सुरू करणार असल्याचे त्याने सांगितले. (Rishab Shetty)
‘कांतारा: चॅप्टर ३’पासून ते ‘जय हनुमान’ आणि ‘द प्राईड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’पर्यंत ऋषभ शेट्टीचे आगामी प्रकल्प चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार असल्याची चर्चा सध्या मनोरंजनविश्वात रंगली आहे.
हेही वाचा : Leopard: पिंपरखेड भागात बिबट्या जेरबंद; वनविभागाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन





