उरण हत्याकांडप्रकरणातील मोठी अपडेट समोर; अखेर दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

Uran Murder Case | उरणमधील येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करण्यात आली. यशश्रीची हत्या झाल्यापासून मुख्य आरोपी दाऊद शेख फरार होता. अखेर कर्नाटकातून दाऊदला ताब्यात घेण्यात आले आहे. दाऊद शेख व्यतिरिक्त याप्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज समोर
दरम्यान, हत्येच्या दिवशीचे नवी मुंबईतील घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यात २ वाजून १२ मिनिटांनी ज्या मार्गावरुन तरुणी गेली, तिथूनच फक्त दहा मिनिटांनी आरोपीही चालत गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
आरोपीवर 2019 मध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता
संबंधित तरुणीची छेड काढल्यामुळे आरोपीवर 2019 मध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करण्यात आली होती. मात्र सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क केला आणि त्यातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची माहिती समोर आली. यशश्रीच्या मारेकऱ्यानं निर्दयीपणे तिच्यावर वार केले, तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर तरुणीचा मृतदेह 26 तारखेला सकाळी उरणमधील एका पेट्रोल पंपाजवळ सापडला होता. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी दाऊदवर आरोप केले. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा:





