Rohit Shetty | दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्या ‘गोलमाल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत या चित्रपटाचे चार भाग प्रदर्शित झाले असून या पाचव्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता या चित्रपटाबाबत रोहित शेट्टीने मोठी अपडेट दिली आहे. एका मुलाखतीत रोहित शेट्टीने सांगितले की, “गोलमाल 5 चित्रपटावर काम सुरू आहे. मात्र, सध्या या चित्रपटाला वेळ लागणार आहे. गोलमाल चित्रपटाची मालिका पुढे सुरुच राहणार आहे. गोलमाल चित्रपटातील मुख्य कलाकार कधीही बदलणार नाही. असा विचारही मी करू शकत नाही. हा चित्रपट येत्या 2 वर्षांत प्रदर्शित होईल,” अशी माहिती त्याने दिली आहे. याशिवाय रोहितने ही मालिका त्याच्या हृदयाच्या अगदी जवळची असल्याचे सांगितले आहे. Rohit Shetty | दरम्यान, रोहित शेट्टीने 2006 मध्ये पहिल्यांदा ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’ बनवला होता. यानंतर 2008 मध्ये त्याने ‘गोलमाल रिटर्न्स’ आणला. 2010 मध्ये ‘गोलमाल 3’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर 2017 मध्ये रोहितने 7 वर्षानंतर चौथा चित्रपट आणला. 70 कोटी रुपयांच्या बजेटने 300 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. ‘गोलमाल 5’सह रोहितचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Rohit Shetty | हेही वाचा: “राऊतांच्या संगतीत राहून ठाकरेंची भाषा..” ; ‘दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार’ म्हणणाऱ्या ठाकरेंना शिंदे गटाचे उत्तर