मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान म्हणाले,”त्यासंदर्भातील..”

अकोला – राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expantion) होणार आहे. त्यासंदर्भातील चर्चा सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DevendraFadanvis) यांनी दिली.अकोला येथे आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू होणाऱ्या घटना गांभीर्याने घेतल्या पाहिजे. या प्रकारच्या संवेदनशील घटनांचे राजकारण न करता अधिकाधिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तीच राज्य शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
रामराज्यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या विधानावर त्यांना विचारले असता, संजय राऊतांना (Sanjay Raut) मी कधीच उत्तर देत नाही. कारण उत्तर देण्याच्या लायकीचे ते नाहीत. ते काहीही बोलतात. मात्र, एका गोष्टीचा आनंद आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना रामराज्य मानते. रामराज्याची संकल्पना तर त्यांनी केव्हाच सोडली आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.
बच्चू कडू (Bachhu Kadu) नाराज असल्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केले. स्थानिक एखादी घटना घडली तर संपूर्ण भाजपवर त्याचे खापर फोडणे योग्य नाही. शेवटी बच्चू कडू आमचे सहकारी आहेत. दोन्ही बाजूने मैत्रीचा धर्म निभावला पाहिजे. मी स्वत: त्यांच्याशी चर्चा करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.





