Ramesh Thorat : शरद पवारांना मोठा धक्का! पुणे जिल्ह्यातील दौंडचा शिलेदार हाती घड्याळ बांधणार; या दिवशी पक्षप्रवेश

Ramesh Thorat : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार रमेश थोरात हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा होत होती. अखेर थोरातांनी तुतारी सोडून आपली हाती घड्याळ बांधणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
रमेश थोरात हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या हाती घड्याळ बांधणार आहेत. येत्या १ अॅागस्टला थोरात यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वरवंड येथे पार पडणार आहे. रमेश थोरात यांनी २०२४ ची दौंड विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लढवली होती. मात्र, त्यांना पराभूत व्हावे लागले.
वरवंड येथे होणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात रमेश थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काका आणि पुतण्यांमध्ये पक्ष विभागला गेला आहे. भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदांच्या निवडणुका लक्षात घेता रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
दौंड तालुक्यातील राजकारण
पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातील राजकारण थोरात आणि कुल या दोन राजकाण्यांभोवती फिरते. सध्या या विधानसभा क्षेत्राचे आमदार भाजपचे राहुल कुल आहेत. मतदारसंघात दोन्ही नेत्यांची ताकद मोठी आहे. कुल आणि थोरात असे दोन गट तालुक्यात कार्यरत आहेत. थोरात हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असल्याने ते महायुतीचाच एक भाग होणार आहेत. यामुळे आगामी काळात येथील राजकारणाचे वारे कोणाच्या दिशेने फिरणार हे पाहणे अत्यंत महत्वाचे असणार आहे.
…अन् निर्णय घेतला.
२०२४ ची विधानसभा निवडणूक रमेश थोरात यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढवली होती. मात्र, त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांचा काळ लोटल्यानंतर रमेश थोरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
रमेश थोरात कोण आहेत?





