‘हे’ बॉलिवूड स्टार्स लपून छपून Dating Apps वापरतात; उर्वशी रौतेलाचा मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल उर्वशी रौतेला सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने डेटिंग ॲप्स वापरण्याविषयी खुलासा केला. एवढेच नाही तर तिने कोणकोणते बॉलिवूड स्टार्स डेटिंग ॲप्स वापरतात हेदेखील सांगितले आहे.
काय म्हणाले उर्वशी रौतेला ?
“स्टार्स आपली ओळख लपवून डेटिंग ॲप वापरतात.” या लिस्टमध्ये ऋतिक रोशनचं नाव आहे. सध्या ऋतिक सबा आझादला डेट करत आहे. मात्र तरीही तो डेटिंग ॲप्सवर आहे. या लिस्टमध्ये जान्हवी कपूरचंही नाव आहे. बॉयफ्रेंड असूनही ती डेटिंग ॲप वापरते. आदित्य रॉय कपूरही डेटिंग ॲपवर आहे. नुकतंच त्याचं अनन्या पांडेसोबत ब्रेकअप झालं आहे.
वाणी कपूरचंही नाव उर्वशीने घेतलं. ‘‘तीदेखील प्रेम शोधत आहे.’’ अर्जुन कपूरदेखील डेटिंग ॲपवर आहे. मलायका अरोरासोबत नुकतंच त्याचं ब्रेकअप झालं आहे. अर्जुनही रिकाम्या वेळेत डेटिंग ॲप वापरतो. नेहा शर्माही डेटिंग ॲपवर आहे. सोनल चौहानदेखील डेटिंग ॲपचा वापर करते असे उर्वशी रौतेला म्हणाली.





