उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा ! केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘ती’ मागणी केली मान्य

मुंबई : विधानसभेच्या निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरेंना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना उबाठा पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता देणगी स्विकारता येणार आहे.
देणगी स्वीकारता येणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली होती. या सुनावणीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणारे मशाल चिन्ह आता यापुढेही कायम राहणार आहे. त्यामुळे कलम 29 बी नुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता देणगी स्विकारता येणार आहे.
शरद पवारांनादेखील मिळाला होता दिलासा
काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला दिलासा देण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने देणगी स्वीकारण्यास अधिकृत मान्यता दिली होती. कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारण्याचा अधिकार पक्षाला देण्यात आला होता.





