बारामतीत मोठी राजकीय घडामोड! काका-पुतणे एकत्र येण्याची दाट शक्यता, कारण….

Sharad Pawar | Ajit Pawar | राज्यात ठाकरे बंधू आणि पवार काका-पुतणे एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. नुकताच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. अशातच आता बारामतीमधून एक महत्वाची राजकीय घडामोडी समोर आली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून, बारामतीत मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची माहिती मिळत आहे.
साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाकडे २१ पैकी सहा जागा मागितल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची दाट शक्यता असून, शरद पवार गटाला ६ पैकी किती जागा अजित पवार यांच्या पॅनेलकडून देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती तालुक्यातील एक प्रमुख साखर उत्पादन केंद्र असून, आज सकाळी साडेदहा वाजता अजित पवारांच्या पॅनेलची अंतिम यादी जाहीर होणार आहे.
अजित पवार हे उमेदवारी अर्ज कायम ठेवतील
माळेगावच्या शिवारात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध गुरु- शिष्य अशी लढत होणार आहे. त्यातच शरद पवार गटातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी देखील शरद पवार यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. (दि. १२ जून ) रोजी अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे. त्यामुळे कोण अर्ज माघारी घेणार कोण, तिरंगी की दुरंगी लढत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार हे उमेदवारी अर्ज कायम ठेवतील, असे बोलले जात आहे.
हेही वाचा: पुढील तीन–चार दिवसांत राज्यात मुसळधार, कोकणात अतिवृष्टीची भीती; IMD अलर्ट





