दिल्ली निवडणुकीपूर्वी पुन्हा राम रहीम यांना पॅरोल मंजूर ; ३० दिवस राहणार तुरुंगाबाहेर

Ram Rahim’s parole granted । डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना पुन्हा एकदा पॅरोल मिळाला आहे. मंगळवारी सकाळी त्याला तुरुंगातून सोडण्यात आले. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ३० दिवसांच्या पॅरोलपैकी पहिले १० दिवस राम रहीम सिरसा येथील त्याच्या आश्रमात राहील तर उर्वरित २० दिवस तो बागपतमध्ये राहणार आहे. मंगळवारी पहाटे ५.३० वाजता त्याला रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून सोडण्यात आले. त्यानंतर ते सिरसा येथील त्यांच्या आश्रमात पोहोचले. त्याच्यासोबत हनीप्रीतही होती.
तुरुंगातून मिळालेल्या पॅरोलबाबतच्या माहितीनुसार, राम रहीमचे प्रतिनिधित्व करणारे वकील जितेंद्र खुराणा यांनी यांनी याविषयी माहिती दिली. हा पॅरोल कायद्यानुसार मंजूर करण्यात आला आहे. तसेच, कायद्यानुसार, राम रहीमला ७० दिवसांसाठी पॅरोल मिळू शकतो. त्यासोबतच ‘या पॅरोलचा संबंध कोणत्याही राजकीय कार्यक्रमाशी किंवा निवडणुकीशी जोडला जाऊ नये असेही वकिलांकडून सांगण्यात आले आहे.
हिंसाचारात अनेक लोक मृत्युमुखी पडले Ram Rahim’s parole granted ।
गुरमीत राम रहीम ऑगस्ट २०१७ पासून रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २५ ऑगस्ट २०१७ रोजी पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने साध्वींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात डेरा प्रमुखाला दोषी ठरवले. ज्यासाठी न्यायालयाने त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. राम रहीमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर हरियाणा आणि पंजाबमध्ये हिंसाचार उसळला. ज्यामध्ये सुमारे ४० लोकांचा मृत्यू झाला.
यापूर्वी राम रहीम ११ वेळा पॅरोल Ram Rahim’s parole granted ।
दिल्ली निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या आठ दिवस आधी गुरमीत राम रहीमच्या सुटकेचे अनेक अर्थ काढले जात आहेत. डेरा प्रमुखाला पॅरोल मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याला ११ वेळा पॅरोलवर सोडण्यात आले आहे. हरियाणा निवडणुकीच्या फक्त तीन दिवस आधी राम रहीमला २० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. यासोबतच लोकसभा निवडणुकीपूर्वी ५० दिवसांसाठी सुटकाही देण्यात आली.





