मोठी बातमी: अंबादास दानवेंचा निलंबन कालावधी कमी; ‘या’ दिवशी सभागृहात होणार दाखल

Ambadas Danve| विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भाजप कडून करण्यात आला. यानंतर अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलबंन करण्यात आले होते. मात्र आता अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांचे आता केवळ तीन दिवस निलंबन करण्यात आले असून उद्या म्हणजे शुक्रवारपासून अंबादास दानवे सभागृहात दिसणार आहेत.
अंबादास दानवे यांनी निलंबनाच्या कारवाईनंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती. यानंतर भाजप नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंच्या निलंबनाच्या कालावधीत कपात करण्याची मागणी केली, त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
नेमकं काय घडले होतं?
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने आले. विधान परिषदेत सोमवारी १ जुलैला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केली, असा आरोप भाजप कडून करण्यात आला. अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी, आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. यावर सभागृहात मोठा गोंधळ झाला होता.
हेही वाचा:
राहुल गांधी हाथरसला जाणार, चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार





