Pune BJP : मोठी बातमी! पुणे शहरातील 69 बंडखोर सहा वर्षांसाठी निलंबित; भाजपचे कठोर पाऊल, अनेक बड्या नेत्यांचा समावेश
Pune BJP : भाजपने पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या तसेच बंडखोरी केलेल्या ६९ जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Pune BJP : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत पक्षातील अनेकांनी बंडखोरी केली. त्यामुळे अधिकृत उमेदवारांविरधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरातील ६९ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी दूर ठेवण्यात येणार असून, त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी किंवा पदे दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
भविष्यातही कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका किंवा पक्षशिस्तीचा भंग केल्यास त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाणार असल्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पत्रात काय लिहिलयं आहे?
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सही असलेल्या पत्रात भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष श्री, रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षाकरिता पार्टीमधून निलंबन करण्यात आले आहे. पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षाने स्पष्ट केला आहे, असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.
भाजपने निलंबनाची कारवाई केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :
1. श्री धनंजय जाधव
2. श्री चंद्रकांत पाटे
3. सौ कादंबरी साळवी
4. श्री जितेंद्र टकले
5. श्री किशोर तरवडे
6. श्री अमोल बालवडकर
7. श्री सोमनाथ गुंड
8. सौ मानसी सोमनाथ गुंड
9. सौ अनिता तळाठी
10. सौ पल्लवी गाडगीळ
11. श्री दत्ता भगत
12. श्री विनोद मोहिते
13. श्री रमेश भंडारी
14. श्री समाधान शिंदे
15. श्री मधुकर मुसळे
16. श्री प्रकाश डोरे
17. श्री बाळासाहेब सानवडे
18. सौ मंजू वाघमारे
19. सौ प्रीती वालकर
20. श्री संदीप लोणकर
21. सौ स्मिता गायकवाड
22. श्री संतोष शिंदे
23. श्री युवराज कुञ्जेकर
24. श्री इफ्तियाज मोमीन
25. श्री अप्पणा दादावाडकर
26. श्री पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर
27. अभिजीत उपाध्ये
28. सौ छाया गवळी
29. श्री नवल कुसाळ
30. श्री समीर पठाण
31. श्री प्रणव मोरे
32. श्री योगेश सूर्यवंशी
33. सौ अर्चना योगेश सूर्यवंशी
34. सौ नलिनी मोरे
35. सौ संगिता ठोसर
36. श्री अनिल मेमाणे
37. श्री नितीन मारकड
38. श्री सतीश मारकड
39. सौ वर्षा मारकड
40. श्री रुपेश धुले
41. श्री बापू पोकळे
42. श्री किरण वाळुंज
43. श्री अमोल रायकर
44. श्री संदीप पोकळे
45. मोहिनी देवकर
46. रितेश रासकर
47. सचिन दशरथ दांगट
48. सुरेंद्र कांबळे
49. श्री संदीप जन्हाड
50. सौ सुनीता गलांडे
51. श्री किशोर वाघमारे
52. श्री विजय चौगुले
53. श्री अकबर पठाण
54. श्री राजू साखरे
55. सौ ऐश्वर्या जाधव
56. श्री जितेंद्र जगताप
57. श्री प्रविण खेडकर
58. सौ स्मिता खेडकर
59. सौ उज्वला गोडे
60. श्री बाळासाहेब घोडके
61. श्री सुरेश धनगर
62. सौ स्वाती धनगर
63. सौ सुवर्णा भरेकर
64. सौ पल्लवी केदारी
65. श्री राहुल रामे
66. श्री हरीष परदेशी
67. श्री बंडू जाधव
68. सौ नीता थोरवे
69. श्री प्रीतम नागापुरे





