Baramati By-election 2026 : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे 22 उमेदवार अडचणीत, नेमकं प्रकरण काय?
Baramati By-election 2026 : त्यांच्या नामनिर्देशन अर्जांमध्ये प्राथमिक तपासात सूचक आणि अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून यामुळे या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Baramati By-election 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभ्या असलेल्या तब्बल २२ उमेदवार अडचणीत सापडले असून अनेकांच्या नामनिर्देशन अर्जांमध्ये अनियमितता आढळल्याची माहिती समोर येत आहे.
या उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जांमध्ये प्राथमिक तपासात सूचक आणि अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून यामुळे या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार उमेदवारांना अर्ज दाखल करताना स्थानिक मतदारांच्या सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. मात्र छाननी दरम्यान २२ पैकी सुमारे १२ ते १३ उमेदवारांच्या अर्जांमधील स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ( Baramati By-election 2026)

Baramati By-election 2026 : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे 22 उमेदवार अडचणीत, नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक प्रशासनाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी संबंधित उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
अर्जांवर ज्यांच्या स्वाक्षऱ्या दाखवण्यात आल्या, त्यांनाच फिर्यादी करून पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मतमोजणी सुरू असताना ही बाब समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आठ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, सुनेत्रा पवार यांनी ७० हजारांहून अधिक मतांची आघाडीवर असून विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. विरोधकांची स्थिती कमकुवत दिसत असून, अनेक उमेदवारांचे डिपॅाजिट जप्त होण्याची नामुष्की ओढण्याचे संकेत मिळत आहे.





