अभिनेत्री ‘अश्विनी भावे’कडून मराठी नाटक समूहाला मोठी मदत

मुंबई – कोरोना विषाणूचा वाढता फैलाव पाहत सध्या देशात गेल्या दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले आहेत लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन मुळे देशात सर्वच काही ठप्प आहे. याचा फटका कलाविश्वाला देखील बसला आहे. लॉकडाऊन मुळे चित्रपटांचे शूटिंग बंद असून, सर्व कलाकार आपल्या घरातच बसून आहेत.
दरम्यान, चित्रीकरण बंद असल्याने रंगभूमी कर्मचारी आहेत ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्वांच्या मदतीसाठी आता मराठी अभिनेत्री ‘अश्विनी भावे’ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
अश्विवी भावेनं 200 रंगभूमी कर्मचाऱ्यांचा खर्च उचलणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सोबतच मराठी नाटक समूहाला त्यांनी 20 लाखांची मदत केली आहे. यात प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे ऋषीकेश जोशी आदी मंडळी आहेत. दरमहा 5 लाख असे 4 महिन्यांकरिता 20 अश्विनी भावे यांच्याकडून देण्यात येणार आहेत.
रंगभूमी कर्मचारी आणि नाटक समूहासाठी नक्कीच ही दिलास देणारी बातमी आहे. कारण सध्या सर्व काही ठप्प असल्यानं अनेक रंगभूमी कर्मचारी मोठ्या अडचणीत आले आहेत.





