मोठी नाचक्की.! उत्तर कोरियाची नवीकोरी युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली
Updated On:

North Korea – बुधवारी एका नवीन उत्तर कोरियाई युद्धनौकेच्या प्रक्षेपणादरम्यान एक मोठा अपघात झाला. किम जोंग उन या कार्यक्रमाला उपस्थित असताना हा अपघात झाल्यामुळे देशाची मोठी नाचक्की झाल्याचे बोलले जाते आहे.
किम जोंग उन यांनी हा अपघात म्हणजे गुन्हेगारी कृत्य असल्याचे म्हटले आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्यांच्या अटकेचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
तब्बल ५,००० टन वजनाच्या विध्वंसक युद्धनौकेच्या अयशस्वी प्रक्षेपणाचे साक्षीदार असलेल्या किम यांनी हा अपघात राष्ट्रीय प्रतिष्ठेला कलंकित करणाऱ्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे म्हटले आणि जूनमध्ये सत्ताधारी पक्षाच्या बैठकीपूर्वी जहाज पूर्ववत करण्याचे आदेश दिले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली की नाही हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.





