Uddhav Thackeray | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र ठाकरे गटाला तगडी लढत देण्यासाठी भाजपसह शिंदे गटाने देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यावरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचदरम्यान आता राज्य सरकारकडून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची पाच वर्षांसाठी ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर शिशिर शिंदे आणि पराग आळवणे यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी ट्रस्टमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तर न्यासात पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनाही स्थान दिले आहे. राज्य सरकारने शासननिर्णय काढत ही नियुक्ती अधिकृत केली. या नव्या नियुक्त्यांमुळे प्रकल्पाला अधिक गती मिळण्याची शक्यता असून पुढील वर्षभरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जनतेसाठी खुलं होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शिंदे गटाच्या मागणीकडे दुर्लक्ष दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नसून त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली होती. मात्र या मागणीला न जुमानता राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. Uddhav Thackeray | हेही वाचा: “आता मुलीचं लग्न यापेक्षाही टोलेजंग करणार” इंदुरीकर महाराजांचे टीका करणाऱ्यांना ओपन चॅलेंज, राजकीय सभांवरही केलं भाष्य