केंद्र सरकारचा मोठा निर्णय! TET परीक्षा प्रमाणपत्र वैधता आता अमर्याद

नवी दिल्ली – शिक्षकी पेशात नौकरी मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांना केंद्र सरकारने आज मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आज TET ची वैधता अमर्याद वाढवली आहे. यापूर्वी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिची वैधता ७ वर्ष इतकी होती.
शिक्षक म्हणून नौकरी करायची असल्यास अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्र अर्थात TET परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. दरम्यान, केंद्र सरकारचा हा निर्णय २०११ पासून लागू करण्यात येणार असल्याने यापूर्वी TET परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना देखील सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.
याबाबतचा निर्णय केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी घोषित केला आहे. २०११ या वर्षानंतर शिक्षक पात्रता प्रमाणपत्र ( TET Exam ) बाद झालेल्या सर्व उमेदवारांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेत.
The validity period of Teachers Eligibility Test (TET) qualifying certificate extended from 7 years to lifetime with retrospective effect from 2011: Ministry of Education pic.twitter.com/pMh3NtrLA3
— ANI (@ANI) June 3, 2021





