Dadasaheb Phalke : महाराष्ट्र राज्यातील मंदिरांचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. आता ही ओळख आणखी जास्त वाढणार आहे, याचं कारण म्हणजे राज्य सरकाराने काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्ये फिल्म सिटी बांधण्यात येणार आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचं जन्मस्थळ म्हणून नाशिकची ओळखले जाते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने या प्रकल्पासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या डोंगराळ भागात ही फिल्म सिटी बांधली जाणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पासाठी जमीन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (वित्त आणि नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नाशिक हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आणि निर्माता-दिग्दर्शक, पटकथा लेखक दादासाहेब फाळके यांचे जन्मस्थान आहे. ही फिल्मसिटी मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या धर्तीवर इगतपूरी येथील फिल्मसिटीची उभारणी केली जाणार आहे. या फिल्मसिटीमध्ये एक मोठे कॉम्प्लेक्स असेल, ज्यामध्ये इनडोअर स्टुडिओ, आउटडोअर सेट आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन शो चित्रीकरणासाठी सुविधा मिळतील. अजित पवार काय म्हणाले? नाशिक ही भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे नाशिक येथे चित्रपटसृष्टी उभारणे ही फक्त सांस्कृतिक दृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक, पर्यटन आणि प्रादेशिक विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. महामार्ग, रेल्वे, विमान वाहतूक आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने झालेल्या पायाभूत सुविधा या सर्व घटकांमुळे चित्रनगरीच्या निर्मितीसाठी नाशिक सर्वार्थाने अनुकूल आहे. या प्रकल्पाची तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्यता तपासण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे तातडीने अद्ययावत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कोण होते दादासाहेब फाळके? दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट उद्योगाचे “जनक” म्हणून ओळखले जाते. त्यांनी धार्मिक आणि पौराणिक कथांवर आधारित असंख्य चित्रपट बनवले. या चित्रपटांमध्ये राजा हरिश्चंद्र, सत्यवान आणि सावित्री या चित्रपटांचा विशेष उल्लेख करण्यात येतो. दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांना पुरस्कारही मिळाले आहेत. हेही वाचा : “दैवी शक्तीनं सांगितलं अन्…”, सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचे मोठे विधान