“दैवी शक्तीनं सांगितलं अन्…”, सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचे मोठे विधान

CJI B.R. Gavai। सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. राकेश यांनी या प्रकरणावर धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणाले, “मला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही.” राकेश किशोर यांनी हे का केले हे देखील स्पष्ट केले. खजुराहो याठिकाणी एका मंदिरात भगवान विष्णूच्या तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराच्या याचिकेवर सरन्यायाधीश सुनावणी करत होते.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, वकील राकेश किशोर यांनी, “एका दैवी शक्तीने मला हे करण्यास सांगितले. मी तुरुंगात गेलो असतो तर बरे झाले असते. माझे कुटुंब माझ्या कृतीवर खूश नाही. ते समजू शकत नाहीत.” असे त्यांनी म्हटले आहे. पुढे राकेश किशोर म्हणाले की.”त्यांना त्यांच्या कृतीबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही”
बार कौन्सिलकडून राकेश किशोर निलंबित CJI B.R. Gavai।
भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेले वकील राकेश किशोर यांना बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) ने सोमवारी तात्काळ निलंबित केले. ही घटना काल सकाळी ११:३५ वाजता घडली. ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपी वकिलाला तात्काळ ताब्यात घेतले.
बीसीआयचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांनी जारी केलेल्या अंतरिम निलंबन आदेशात म्हटले आहे की आरोपीचे वर्तन न्यायालयाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे आणि वकिलांच्या आचारसंहिता आणि वकिलांच्या कायदा, १९६१ च्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे.
राकेश किशोर कोणत्याही न्यायालयात हजर राहू शकणार नाहीत CJI B.R. Gavai।
बीसीआयने असेही म्हटले आहे की निलंबनाच्या कालावधीत, आरोपी वकील कोणत्याही न्यायालयासमोर, प्राधिकरणासमोर किंवा न्यायाधिकरणासमोर हजर राहू शकणार नाही आणि त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल.

