मुंबईवर मोठं संकट ! प्रवाशांनी भरलेली मोनोरेल मध्येच बंद पडली, 200 प्रवासी उंचावरच अडकले
Mumbai | Monorail : एकीकडे मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना, लोकल सेवा ठप्प असताना दुसरीकडे मोनोरेलचा खोळंबा झाल्याचं दिसून आलं. सायंकाळी 6.15 वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली.
प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधला असून, मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले आहे. आत्तापर्यंत 10 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मोनोरेलमध्ये अनेक वृद्ध, महिला, लहान मुलं असून प्रवाशांचा श्वास गुदरमत आहे. चेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती अचानक बंद पडली असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या माहितीनुसार थांबवण्यात आलेली ही मोनोरेल एका बाजून झुकलेली आहे. त्यामुळे अपघाताचीही भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. यावेळी प्रवाशांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आहे.





