‘बिग बीं’ची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक! अयोध्यानगरीत भूखंड खरेदीसाठी मोजले तब्बल ‘इतके’ रुपये

Amitabh Bachchan ; हिंदी चित्रपट सृष्टीचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे सातत्याने कुठेना कुठे गुंतवणूक करतच असतात. नुकतीच त्यांनी अयोध्यानगरीत मोठी गूंतवणूक केली आहे. त्यांनी २५,००० चौरस फुटचा भूखंड अयोध्यानगरीत खरेदी केली आहे. यासाठी तब्बल बच्चन यांनी ४० कोटी रुपये मोजले आहेत. अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर विकास केला जात आहे. अमिताभ बच्चन यांनी केलेली ही मोठी गूंतवणूक असल्याचे सांगितले जात आहे. ही त्यांची आतापर्यंतची अयोध्येत चौथी मोठी गूंतवणूक आहे.
अमिताभ बच्चन यांनी अयोध्यत राम मंदिर उद्घाटनापूर्वी 5,372 चौरस फूटचा एक भूखंड 4.54 कोटी रुपयांना खरेदी केला होता. अलिकडेच त्यांनी बॉलीवूड निर्माता आनंद पंडित यांच्या रिअल इस्टेट कंपनीत 20 कोटी रुपये गुंतवले आहेत. त्यांनी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या नावावर असलेल्या ट्रस्टच्या नावावर 54,000 चौरस फूट जमीन खरेदी केली आहे. येथे त्यांना आपल्या वडिलांचे स्मारक बांधायचे आहे. बच्चन यांनी मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात देखील मोठी गूंतवणूक केली आहे.
बच्चन कटुंबाची एकूण मालमत्ता
माध्यमांमध्ये असलेल्या बातमीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या पती जया बच्चन यांनी राज्यसभेच्या खासदार पदासाठी भरलेल्या प्रतिज्ञापत्रात बच्चन कटुंबाची एकूण मालमत्ता किती आहे, याची तपशीलवार माहिती देण्यात आली होती. प्रतिज्ञापत्रानुसार बच्चन कटुंबाच्या नावावर एकूण 1,578 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ज्यामध्ये 49.11 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून 729.77 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.





