मुंबई – प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयात सुरु असलेल्या एका खटल्यामध्ये बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन वर्षांसाठी शिक्षा सुनावली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला. बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर कडू उच्च न्यायालयात दाद मागणार कि तुरुंगात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी बच्चू कडू यांनी अनेक आंदोलने केली आहेत. अनेकदा त्यांना अटक देखील झाली होती. मात्र आता 2017 च्या एका प्रकरणात बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. बच्चू कडू हे आपल्या प्रहार संघटनेद्वारे राजकीय सामाजिक कार्य करत असतात. काय घडलं होत 2017 मध्ये बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी 2017 मध्ये तीव्र आंदोलन केले होते. महापालिकेत हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती. यानंतर बच्चू कडू यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण नाशिक सत्र न्यायालयात गेले होते. या प्रकारनाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दिव्यांसांसाठी केलेल्या आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी असलेला तीन टक्क्यांचा राखीव निधी खर्च केला जात नसल्याची तक्रार केली होती. त्याच दरम्यान कडू दिव्यांगांसाठी आंदोलन केलं होते. आंदोलनादरम्यान झालेल्या राड्या दरम्यान कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर कडू यांच्यासमोर आणखी काही महत्वाचे पर्याय आहेत. ज्यानुसार ते या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू शकतात. आज किंवा उद्या कडू हे आपल्या वकिलांच्या मार्फत वरच्या न्यायालयात दाद मागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.