Divya Shinde : मोठी बातमी..! पुण्यात ‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदेला अटक; पोलिसांच्या कारवाईने खळबळ
Divya Shinde : ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे हिला पुणे पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Divya Shinde : ‘बिग बॉस मराठी’ फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेला पुण्यात पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरला मारहाण करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दिव्या शिंदेला न्यायालयात हजर केले आहे. (Divya Shinde)
मिळालेल्या माहितीनुसार, एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचा मोबदला मागण्याच्या कारणावरून दिव्या शिंदे आणि तिच्यासोबत असलेल्या काही व्यक्तींनी ज्येष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात प्रवेश केल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांना मारहाण करून ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. (Divya Shinde)
या घटनेनंतर डॉ. गायकवाड यांनी काळेपडळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. (Divya Shinde)
तपासादरम्यान पोलिसांनी दिव्या शिंदेला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी, इतर व्यक्तींचा सहभाग आणि कथित खंडणीच्या मागणीबाबत अधिक तपास केला जात आहे. (Divya Shinde)
दरम्यान, दिव्या शिंदे ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रिल्स आणि डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत आली होती. सोशल मीडिया कंटेंटमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने ‘बिग बॉस मराठी’मध्येही सहभाग घेतला. त्यामुळे तिच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रासह सोशल मीडिया वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. (Divya Shinde)
Divya Shinde : ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?






