Sharad Lad : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने आखणी केली जात आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून पक्षातील नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपविण्यात येत आहे. या सगळ्या वातावरणात अनेकजण ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला रामराम करत दुसऱ्या पक्षाची कास धरत आहे. यामुळे राजकीय वातावरणाचं वारं कधी कोणत्या दिशेला फिरेल याचा काही नेम नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाचे आमदार पुत्र लवकरच भाजपवासी होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली असून राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद लाड हे मुंबईत पक्षप्रवेश करणार आहेत. ७ अॅाक्टोबर या दिवशी हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. कोण आहेत शरद लाड? शरद लाड हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांचे नातू आहेत. त्यांचा भाजप प्रवेश जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मोठा फटका बसू शकतो. कारण शरद लाड यांचं स्थानिक पातळीवर वजन आणि दांडगा जनसंपर्क यामुळे ते जनमाणसांत लोकप्रिय आहेत. यामुळे त्यांच्या या गोष्टीचा फायदा भाजपला होऊ शकतो. हेही वाचा : India’s 58th richest man: ‘स्वदेस’ची हिरोईन पडद्यावरून गायब, पण पती ठरले भारतातील ५८ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती