PDP ला मोठा धक्का, मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा पिछाडीवर

Jammu and Kashmir Election Result 2024| जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे मतदान तीन टप्प्यात पार पडले. यानंतर आज 8 ऑक्टोबरला निकाल स्पष्ट होणार आहे. त्यानुसार मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या 90 जागांसाठी काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत आहे. बिजबेहारा मतदारसंघाच्या जागाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. येथून पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती निवडणूक रिंगणात आहेत.
या जागेवर इल्तिजा मुफ्ती यांच्याविरोधात भाजपच्या सोफी युसूफ आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या बशीर अहमद शाह नशीब आजमावत आहेत. मात्र इल्तिजा मुफ्ती या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर NC उमेदवार बशीर अहमद शाह 3877 मतांनी आघाडीवर आहेत.
बिजबेहरा ही जागा गेल्या 25 वर्षांपासून मुफ्ती कुटुंबाचा आणि त्यांचा पक्ष पीडीपीचा बालेकिल्ला आहे. येथून विजयी झाल्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईद आणि त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनले आहेत. यावेळी बिजबेहारा जागा जिंकण्याची जबाबदारी इल्तिजा मुफ्ती यांच्याकडे देण्यात आली आहे. Jammu and Kashmir Election Result 2024|
इल्तिजा मुफ्ती पिछाडीवर
मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर इल्तिजा मुफ्ती यांना 9,096 मते मिळाली आहेत, तर बशीर अहमद शाह यांना 12,973 मते मिळाली आहेत. भाजपच्या सोफी युसूफ यांना 1,244 मते मिळाली आहेत. बिजबेहरा मतदारसंघातील 654 मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला आहे. बिजबेहरा जागेवर मतमोजणीच्या एकूण 15 फेऱ्या होणार आहेत. Jammu and Kashmir Election Result 2024|
यावेळी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा जागेसाठी रंजक लढत असल्याचे मानले जात आहे. मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांना अनंतनागमधून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता इल्तिजा मुफ्ती या विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका
जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 2014 आणि 2008 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पीडीपीचे अब्दुल रहमान भट्ट बिजबेहारा मतदारसंघातून विजयी झाले होते. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार बशीर अहमद शाह यांचा पराभव केला.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान झाले. सध्या नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस तब्बल 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजप 27, पीडीपी 3 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर आहेत.
हेही वाचा:
हरियाणातील उलथापालथीनंतर भाजपची आगेकूच ; जेपी नड्डा यांनी बोलावली सरचिटणीसांची बैठक





