Jacqueline Fernandez: “जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का! २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात नवा ट्विस्ट”
Jacqueline Fernandez जॅकलिन फर्नांडिसने दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाच्या ३० मे रोजी दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ट्रायल कोर्टाने जॅकलिन, कथित मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना पॉल आणि इतर १४ आरोपींविरोधात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते.

Jacqueline Fernandez: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) हिच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्डरिंग आणि खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांनी स्वतःला या खटल्याच्या सुनावणीतून दूर केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी नव्या खंडपीठासमोर होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित दुसऱ्या एका खटल्यात त्यांचा मुलगा वकील म्हणून काम करत आहे. त्यामुळे कोणताही हितसंबंधांचा संघर्ष किंवा निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी त्यांनी स्वतःला या खटल्याच्या सुनावणीतून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आता जॅकलिन फर्नांडिसने दाखल केलेल्या याचिकेवर दुसरे न्यायपीठ सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण २४ जून रोजी नव्या खंडपीठासमोर सूचीबद्ध केले आहे. त्या दिवशी या प्रकरणावर पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Jacqueline Fernandez)
जॅकलिन फर्नांडिसने दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाच्या ३० मे रोजी दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ट्रायल कोर्टाने जॅकलिन, कथित मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना पॉल आणि इतर १४ आरोपींविरोधात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते.
जॅकलिनचे म्हणणे आहे की, तिच्याविरोधात उपलब्ध पुरावे आणि तथ्ये आरोप निश्चित करण्यासाठी पुरेशी नाहीत. त्यामुळे ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी तिने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. (Jacqueline Fernandez)

Jacqueline Fernandez: “जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का! २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात नवा ट्विस्ट”
हे संपूर्ण प्रकरण २०० कोटी रुपयांच्या कथित खंडणी आणि मनी लॉन्डरिंगशी संबंधित आहे. या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, सुकेश चंद्रशेखरने तुरुंगात असतानाच एका उद्योगपतीच्या पत्नीची फसवणूक करून सुमारे २०० कोटी रुपये उकळले होते.
ईडीचा दावा आहे की, या कथित गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा वापर अनेक व्यक्तींना आर्थिक लाभ देण्यासाठी करण्यात आला. यामध्ये जॅकलिन फर्नांडिसचाही समावेश असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. (Jacqueline Fernandez)
तपासादरम्यान ईडीने असा दावा केला की, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला कोट्यवधी रुपयांचे महागडे भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये लक्झरी कार, मौल्यवान दागिने, महागड्या ब्रँडच्या पर्स आणि इतर अनेक आलिशान वस्तूंचा समावेश होता. याशिवाय जॅकलिनच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही आर्थिक लाभ मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ईडीच्या माहितीनुसार, जॅकलिनच्या बहिणीच्या परदेशातील बँक खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली होती. तसेच तिच्या भावाच्या खात्यातही पैसे पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र जॅकलिन फर्नांडिसने सुरुवातीपासूनच हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील या नव्या घडामोडीमुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. २४ जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, नव्या खंडपीठाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे मनोरंजन क्षेत्रासह कायदेविषयक वर्तुळाचेही लक्ष असेल.





