Champions Trophy : भारताला मोठा धक्का ! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूची निवृत्ती

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटर ऋद्धिमान साहाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
ऋद्धिमान साहाला मागील अनेक वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळाली नव्हती. 40 वर्षांचा ऋद्धिमान साहा हा देशांतर्गत सामने खेळून त्यात चांगली कामगिरी करत होता. ऋद्धिमान रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाकडून खेळत होता.शनिवारी शेवटचा रणजी ट्रॉफीचा सामना खेळल्यावर त्याने निवृत्तीची घोषणा केली. ऋद्धिमान साहाने टीम इंडियासाठी शेवटचा टेस्ट सामना डिसेंबर 2021 रोजी खेळला होता. तसेच शेवटचा वनडे सामना त्याने नोव्हेंबर 2014 रोजी खेळला होता. त्यानंतर ऋद्धिमान साहाला टीम इंडियात संधी मिळाली नाही.
त्याने काय लिहिले पोस्टमध्ये?
“सुंदर प्रवास आज संपला. मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे. मी पहिल्यांदा 1997 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले होते, तिथपासून आजपर्यंतचे जवळपास 28 वर्ष लोटली. काय सुंदर प्रवास होता आहे. माझ्या देशासाठी, राज्यासाठी, जिल्हा, क्लब, विद्यापीठ आणि कॉलेजसाठी खेळणे माझ्याकरता गौरवाची गोष्टी राहिली आहे.
Thank You, Cricket. Thank You everyone. 🙏 pic.twitter.com/eSKyGQht4R
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) February 1, 2025
ऋद्धिमान साहाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने भारतासाठी 40 टेस्ट सामने खेळले आहेत. यात त्याने 1353 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतक आणि 6 अर्धशतके यांचा समावेश आहे. त्याने भारताकडून 9 वनडे सामने खेळला असून यात त्याची बॅट जास्त चालली नाही. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 16 धावा असते. आयपीएलमध्ये साहाने 170 सामने खेळले असून यात त्याने 2934 धावा केल्या आहेत. यात त्याने 1 शतक लागवले आहे.
त्याच्या देशाअंतर्गत करिअर बद्दल बोलायचे झाले तर 142 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 7169 धावा केल्या. यात त्याने 14 शतक आणि 44 अर्धशतक लगावली. साहाने लिस्ट ए मधील 116 सामन्यांमध्ये 3072 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 शतक आणि 20 अर्धशतके लगावली आहेत.





