Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांना घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

Maharashtra Politics : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांना घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘त्रिशूल आंदोलना’शी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीच्या सणात झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. (Maharashtra Politics)
नेमकं प्रकरण काय?
वेकोली (WCL) प्रशासनाविरोधात स्थानिक बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाशी संबंधित तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी आवाजाचे नमुने देण्यासाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. (Maharashtra Politics)
मात्र, दिवाळीचा सण असल्याने आणि आपण मुंबईत असल्यामुळे दिवाळीनंतर पोलिसांसमोर हजर राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती आपण केली होती, असे जिवतोडे यांनी सांगितले. तरीही दिवाळीच्या दिवशी पोलिसांनी घरी येऊन कारवाई केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. (Maharashtra Politics)
‘प्रशासनाकडून सत्तेचा गैरवापर’
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मुकेश जिवतोडे यांनी पोलीस प्रशासनावर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. “आम्ही सत्तेत असलो तरी प्रशासनाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” असे ते म्हणाले. (Maharashtra Politics)
दिवाळीच्या काळात घरी लहान मुले आणि नातेवाईक उपस्थित असताना पोलिसांनी कारवाई केल्याने कुटुंबावर मानसिक ताण निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
‘जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले’
आपल्यावर खंडणी किंवा मारहाणीचा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा दावा जिवतोडे यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी आपण आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी पाठवलेल्या नोटिशीमध्ये महिलांशी संबंधित तसेच अवैध दारूविक्रीसंदर्भातील गुन्ह्यांचा उल्लेख करून कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणांशी आपला संबंध नसल्याचे जिवतोडे यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)




