Political News : भाजपला मोठा धक्का! दोन माजी आमदारांनी सोडली साथ, ‘या’ पक्षात केला प्रवेश
Political News : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा हादरा बसला आहे.

Political News : उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजपचे दोन माजी आमदार सिनोद शाक्य आणि कुशाग्र सागर यांनी पक्षाची साथ सोडत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी पक्षप्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. (Political News)
या पक्षप्रवेशावेळी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपाल सिंह यादव आणि बदायूं लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदित्य यादव उपस्थित होते. (Political News)
सिनोद शाक्य आणि कुशाग्र सागर यांचा भाजपला रामराम
दातागंज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिनोद शाक्य आणि बिसौली मतदारसंघाचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांच्या पक्षांतरामुळे बदायूं जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे. (Political News)
सिनोद शाक्य हे २००७ आणि २०१२ मध्ये बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. पुढे २०२२ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी पुन्हा समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. (Political News)
भाजपमधील नाराजीची चर्चा
सिनोद शाक्य हे गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. कुशाग्र सागर यांच्या पक्षांतरामुळेही स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. (Political News)
आगामी निवडणुकीत समाजवादी पक्षाला फायदा होणार?
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षात होणारे हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. मात्र, या पक्षांतरांचा निवडणुकीतील निकालावर नेमका किती परिणाम होईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल. (Political News)
सिनोद शाक्य यांना समाजवादी पक्षाकडून पुन्हा विधानसभेची उमेदवारी मिळणार का, तसेच या प्रवेशानंतर भाजप आणि समाजवादी पक्षाची स्थानिक रणनीती कशी बदलणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असेल. (Political News)
Political News : भाजपला मोठा धक्का ! ‘या’ 2 बड्या नेत्यांनी सोडली साथ



