Mitchell Starc retirement : ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची निवृत्तीची घोषणा; कारण…

Mitchell Starc retirement : क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंकडून निवृत्तीची घोषणा केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचा स्टार स्पिनर आर अश्विन अर्थात रविचंद्रन अश्विन याने आयपीयलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता नुकतेच अॅास्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाच मिचेल स्टार्कने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.
त्याच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. स्टार्क याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर करत माहिती दिली. पोस्टमधून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वनडे आणि देशांतर्गत टी २० लीगमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे त्याने या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे. मात्र, भारतामध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये स्टार्क खेळताना दिसणार आहे.
कोण आहे मिचेल स्टार्क?
मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आहे. स्टार्क याने ऑस्ट्रेलियासाठी सामना, मालिका जिंकून देणारी गोलंदाजी केली आहे. क्रिकेटविश्वात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. २०२१ च्या टी २० विश्वचषक विजयात स्टार्कने महत्वाची कामगिरी बजावली होती. २०२४ मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्येही स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या संघात सहभागी होता. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० क्रिकेटपूर्वी मिचेल स्टार्क टी २० मध्ये खेळणार नसल्याचं जाहीर केल्याने हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
🚨 MITCHELL STARC HAS ANNOUNCED HIS RETIREMENT FROM T20I 🚨
– He will focus on Tests & ODIs, Thank you Cricket Icon. pic.twitter.com/UUc0S5iceC
— Johns. (@CricCrazyJohns) September 2, 2025
हेही वाचा : Mrunal Thakur: मृणाल ठाकूर पुन्हा चर्चेत; बिपाशा नंतर अनुष्का शर्मावर अप्रत्यक्ष टीका?





