Glenn Maxwell : पंजाब किंग्जला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू IPL 2025 मधून बाहेर

Glenn Maxwell Ruled Out of IPL 2025 Due to Finger Injury : आयपीएल २०२५ चा ४९ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जातआहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू बोटाच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, मॅक्सवेलच्या बोटाला फ्रॅक्चर झाले आहे. तथापि, अय्यरने मॅक्सवेल उर्वरित हंगामातून बाहेर आहे की नाही हे सांगितले नाही. परंतु, त्यानी सांगितले की आम्ही अद्याप बदली खेळाडूबद्दल विचार केलेला नाही. याचा अप्रत्यक्ष अर्थ असा की दुखापतीमुळे मॅक्सवेलचा आयपीएल २०२५ मधील प्रवास संपल्यात जमा आहे.
PBKS skipper Shreyas Iyer hinted that Glenn Maxwell is ruled out for the remainder of the IPL 2025 season due to a finger injury 🤕🗣️#GlennMaxwell #IPL2025 #CSKvPBKS #Sportskeeda pic.twitter.com/iCvnSOa0ze
— Sportskeeda (@Sportskeeda) April 30, 2025
आयपीएल २०२५ मधील कामगिरी –
या हंगामात ग्लेन मॅक्सवेलने काही खास कामगिरी केली नव्हती. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत अपयशी ठरत होता. त्याने खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये निराशा केली. मॅक्सवेलने ६ डावांमध्ये ७,७,३,१,३० आणि शून्य धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत. मॅक्सवेलने ६ डावात फक्त ४८ धावा केल्या हे त्याच्या अलीकडील फॉर्मचे प्रतिबिंब आहे.
हेही वाचा – Vikas Kohli : विराट कोहलीचा भाऊ IPL 2025 दरम्यान संजय मांजरेकरवर का संतापला? जाणून घ्या कारण
ग्लेन मॅक्सवेलची आयपीएल कारकीर्द –
ग्लेन मॅक्सवेलच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचे, तर त्याने २०१२ साली आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपला प्रवास सुरू केला होता. तेव्हापासून, त्याने या लीगमध्ये अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत आणि आपल्या अष्टपैलू खेळाने संघाला बळकटी दिली आहे. त्याने आतापर्यंत एकूण १४१ सामने खेळले असून त्यापैकी १३५ डावांमध्ये २३.८८ च्या सरासरीने आणि १५५.१४ च्या स्ट्राईक रेटने २,८१९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वात मोठी खेळी ९५ धावांची आहे, तर त्याने १८ वेळा अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच ३४.४६ च्या सरासरी ४१ विकेट्स घेतल्या आहे.





