बिग बीने दाखविली 3 पिढ्यांची झलक

बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर आपल्या परिवारातील तीन पिढ्यांची झलक दाखविणारा एक फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ बच्चन आपले आजोबा खजान सिंह सुरी आणि मुलगा अभिषेकसह दिसत आहे.
या फोटोत तिघेही पगडीमध्ये दिसत आहेत. या अगोदार अमिताभ बच्चन यांनी आपली दिवंगत आई तेजी बच्चन यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा एक जुना फोटो शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या जुन्या मोनोक्रॉम फोटोत ते आपली आई आणि भाऊ अजिताभ यांच्यासोबत दिसत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अमिताभ बच्चन यांच्यासाठी आगामी वर्ष हे खूपच व्यस्त असणार आहे. कारण वर्षभरात त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
“चेहरे’मध्ये त्यांच्यासोबत इमरान हश्मी मुख्य भूमिका साकारत आहेत. तसेच नागराज मंजुळे यांच्या “झुंड’, अयान मुखर्जी यांच्या “ब्रह्मास्त्र’मध्ये ते झळकणार आहे. याशिवाय त्यांचा “मेडे’ हा आणखी एक चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. यात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह आदी कलाकारांनी निर्णायक भूमिका साकारल्या आहेत. दुसरीकडे दीपिका पदुकोण आणि प्रभासच्या चित्रपटातही ते भूमिका साकारणार आहेत. ज्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.





