अकलूज -अकलूज-वेळापूर रस्त्यावरील माळेवाडी येथे मालवाहतूक करणारा कंटेनर आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघातात वेळापूर येथील मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अकलूज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
ओंकार पांडुरंग दांडगे हा आई छाया पांडुरंग दांडगे आजारी असल्याने आपली बहीण सृष्टी पांडुरंग दांडगे हिच्यासोबत दुचाकीवरून अकलूज येथील दवाखान्यात उपचारासाठी जात होता. माळेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ मागून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.
यामध्ये छाया दांडगे व सृष्टी दांडगे यांचा जागीच मृत्यू झाला तर ओंकार दांडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अकलुज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनोद राजकुमार पवार यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली
असून कंटेनर चालक शिव शंकर हाजी बसप्पा ( रा. तामिळनाडू) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सहायक पोलीस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत.