भुशी धरण ओव्हरफ्लो ! लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 166 मिमी पावसाची नोंद
Updated On:

लोणावळा : लोणावळा शहरात 24 तासात तब्बल 166 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण आज बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे मात्र यासाठी पोलिसांची मेहेरनजर असणं आवश्यक असणार आहे.
सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर आणि रात्री देखील मुसळधार पडणाऱ्या पावसाने बुधवारी देखील जोर कायम ठेवल्याने येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात लोणावळा शहरात एकूण 251 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या शनिवारी रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे.



